पुणे: ‘मॉडर्न’ नाव, विचार मात्र जुनाच? दलित तरुणाला नोकरीतून वंचित ठरवले!  विद्येच्या नगरीत जातीय अंधार — प्रेम बिऱ्हाडेच्या प्रकरणाने उघड केली लाजिरवाणी वस्तुस्थिती – व्हिडिओ

0
IMG_20251019_173635.jpg

पुणे पुन्हा एकदा चर्चेत आलंय — कारण यावेळी विषय आहे “प्रमाणपत्रांची राजकारण” आणि शिक्षणातल्या भेदभावाची कुरूप बाजू!

लंडनमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवणाऱ्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाचं स्वप्न मॉडर्न कॉलेजच्या पडताळणीच्या दारातच अडकलं. त्याचा आरोप थेट — “मी दलित असल्यामुळे महाविद्यालयाने माझी कागदपत्रे पडताळणी करण्यास नकार दिला.”

पहा व्हिडिओ

सौजन्य: फेसबुक अकाउंट

असा प्रकार ऐकून प्रश्न पडतो — २१व्या शतकात शिक्षणसंस्था ज्ञान देतात की जात विचारतात?

प्रेम बिऱ्हाडेने फेसबुकवर आपल्या दुःखाचा सूर मांडला आणि सोशल मीडियावर खळबळ माजली. ‘सम्यक विद्यार्थी संघटने’ने महाविद्यालयासमोर आंदोलनाचा बिगुल वाजवला, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने कुलगुरूंना चौकशीची मागणी केली.

मॉडर्न कॉलेजकडून मात्र सरळ उत्तर — “आम्ही त्याची कागदपत्रे ई-मेल केली आहेत,” असं उपप्राचार्य श्यामकांत देशमुख यांनी सांगितलं.

मग नेमकं सत्य कुठं आहे?
दलित तरुणाची तक्रार की कॉलेजची सफाई — दोघांपैकी कोण खोटं बोलतंय हे चौकशीतूनच समजेल. पण इतकं नक्की — शिक्षणाच्या मंदिरात अजूनही जात विचारली जात असेल, तर ज्ञानाचे देव पळून जातील!

लंडनपर्यंत पोहोचणाऱ्या स्वप्नांना पुण्यातच अडवणारी ही ‘फाईल संस्कृती’ बदलणार का, की पुन्हा एखाद्या प्रेम बिऱ्हाडेला नोकरीपेक्षा “जात”च मोठी ठरणार?

Spread the love

Leave a Reply

You may have missed