पुणे: शिवाजी मटन व चिकन मार्केट येथे कारवाईला सुरुवात; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) कडून स्वागत – व्हिडिओ

पुणे : शिवाजी मटन व चिकन मार्केट परिसरात कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. सेंट झेवियर चर्च आणि सेंट अँट गर्ल्स हायस्कूल या परिसरात कारवाईचे आदेश आल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
पहा व्हिडिओ
या कारवाईचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) तर्फे स्वागत करण्यात आले आहे. पक्षाचे नेते राजेश भाऊ नायर, बारा बलुतेदारचे संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ उबाळे तसेच सर्व पदाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे आणि प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
पक्षाने सांगितले की, शाळा आणि धार्मिक स्थळांच्या आसपास असलेली ही बाजारपेठ अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत होती. नागरिकांच्या तक्रारींनंतर अखेर प्रशासनाने कारवाईस प्रारंभ केल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
या कारवाईनंतर परिसरातील स्वच्छता, सुरक्षा आणि शैक्षणिक वातावरण सुधारेल, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) ने व्यक्त केला आहे.