पुणे: चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून गुन्हेगारांशी संपर्क?; रवींद्र धंगेकरांचा स्फोटक आरोप! पाहा व्हिडिओ

पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळ प्रकरण आता थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दारात येऊन ठेपले आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
धंगेकर म्हणाले, “मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये ‘पाटील’ नावाचा एक व्यक्ती काम करतो. त्याचे मोबाईल पोलिसांनी तपासले तर घायवळशी किती वेळा बोलणे झाले, तसेच मंत्र्यांना किती वेळा निरोप दिले हे स्पष्ट होईल. पण सत्ता असल्यामुळे पोलिस काही करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.”
पहा व्हिडिओ
👉 “ठरवलं तर पोलिस घायवळचा नायनाट करतील”
धंगेकर पुढे म्हणाले, “घायवळ एकटा काही करू शकत नाही. पोलिसांनी ठरवलं तर त्याला नेस्तनाबूत करता येईल. पण ज्यांनी ही पिलावळ वाढवली, त्यांच्यावर अंकुश ठेवला, त्यांचा तपास झाला पाहिजे. पाटील यांच्याभोवती असलेले काही ‘भलतेच’ लोक आहेत.”
👉 “चमकोगिरी सोडा, स्टेशनवर या”
धंगेकरांनी थेट पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, “चंद्रकांत पाटील यांनी फोनवर व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याऐवजी पोलिस स्टेशनला यावं. मंत्री असूनसुद्धा चमकोगिरी करणं शोभत नाही. त्यांच्या आजूबाजूला गुन्हेगारांची गर्दी आहे, त्यांनी आधी त्यांच्यावर लक्ष द्यावं.”
👉 गौतमी पाटीलवरही आरोपांचा भडिमार
धंगेकरांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनाही सोडलं नाही. “उभ्या गाडीला कुणी धडक देऊ शकत नाही. जर असं झालं असेल, तर वाहनचालक पिलेला असणार. क्रेन कुणी बोलावली, कुणी फोन लावला हे सर्व तपासात यायला हवं. पोलिसांनी जर गौतमी पाटील यांना सहआरोपी म्हणून नाव घेतलं नाही, तर त्या तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला.
👉 “गाडीला माणसे उडवण्याचा परवाना आहे का?”
धंगेकर म्हणाले, “गौतमी पाटील यांच्या गाडीला माणसे उडवण्याचा परवाना आहे का? आज मी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांसोबत सिंहगड पोलिस ठाण्यात आलो, कारण न्याय मिळालाच पाहिजे.”
🔹 राजकीय पडसाद
धंगेकरांच्या या आरोपांमुळे शहरात चर्चा रंगली आहे —
“मंत्री पाटील यांच्या ऑफिसमधून गुन्हेगारांशी संपर्क?”
“सत्तेच्या छायेत घायवळसारखे गुंड फोफावत आहेत का?”
या प्रश्नांनी पुण्याचं राजकारण पुन्हा पेटलं आहे!
—