येरवडा: नवरात्रीत लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप

पुणे : श्रीमंत जय भवानी मित्र मंडळ व शिवसेना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना महानगर प्रमुख रविंद्र धगेकर यांच्या हस्ते बहिणींना साड्या देण्यात आल्या.

या प्रसंगी आदर्श नगरसेवक शिवाजीराव क्षिरसागर, भुषण जाधव, सुहास कांबळे, पाला मोरे, श्रीराम व्यकटराम, दिपक अहिरे तसेच महिला उपशहर प्रमुख जयश्रीताई मोरे व सुप्रियाताई व्यकटराम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना उपशहर प्रमुख सुनील जाधव आणि ॲड. स्नेहलताई जाधव यांनी केले. वातावरणात उत्साह व आनंदाचे वातावरण होते.