येरवडा: डॅनियल लांडगे यांच्या उपस्थितीत हेरिटेज वॉकिंग ब्रिजवर स्वच्छता मोहीम – व्हिडिओ

पुणे : येरवडा प्रभाग क्रमांक ६ येथील हेरिटेज वॉकिंग ब्रिज परिसरात गवत, झुडपे व कचऱ्यामुळे नागरिकांना सकाळच्या वॉकिंगला अडथळा येत होता. याबाबतची माहिती काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका मा. सौ. अश्विनी डॅनियल लांडगे व समाजसेवक मा. डॅनियल लांडगे यांना मिळाल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात आली.
पहा व्हिडिओ
या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. त्यानंतर सकाळी प्रत्यक्ष उपस्थित राहून समाजसेवक डॅनियल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गवत-झुडपे काढून टाकण्यात आले व परिसरातील सर्व कचरा साफ करण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांना आता स्वच्छ वातावरणात वॉकिंग करता येणार आहे.
“आरोग्य हीच खरी संपत्ती असून नागरिकांनी दररोज किमान ३० मिनिटे तरी वॉकिंग करावे. सकाळी कोवळ्या उन्हात व ताज्या हवेत वॉक केल्याने दिवसभर ऊर्जा मिळते. त्यामुळे नागरिकांनी हेरिटेज वॉकिंग ब्रिजवर मोठ्या संख्येने यावे,” असे आवाहन डॅनियल लांडगे यांनी केले.
—