पुणे: येरवड्यात पंतप्रधान यांच्या वाढदिवसाच्या निमित्त स्वच्छ ही सेवा व वृक्षारोपण अभियान

पुणे: येरवडा पुणे-भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगर यांच्या वतीने सक्षम नेतृत्व,अलौकिक कर्तृत्व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त “राष्ट्रीय नेते ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” अभियान अंतर्गत मा.आमदार शहराध्यक्ष श्री जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान व वृक्षारोपण अभियान शिवराज चौक कोठी येरवडा,व नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा ग्राउंड या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहा व्हिडिओ

प्रभाग स्वच्छ साठी रात्र दिवस झटणारे स्वच्छता कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन श्री योगेश मुळीक (स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा ), श्री सचिन धिवार (उपाध्यक्ष-अ जा मोर्च्या महाराष्ट्र राज्य),ऍड श्री अतुल साळवे(सचिव -अ जा मोर्च्या महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना अतुल साळवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छता विषयक विविध उपक्रममार्फत देशामध्ये स्वच्छ क्रांती घडवून आणली आहे.संपूर्ण देशात स्वच्छतेचे वारे वाढदिवसाच्या निमित्ताने वाहू लागले आहेत. एक पेड माँ के नाम या ब्रिद वाक्याने तर सर्व पदाधिकारी सर्व देशामध्ये हिरवी गार चादर व निसर्गाचा एक वेगळा करिष्मा करणार असे चित्र देशात तयार होत आहे.येणाऱ्या काळात मोदीजी यांच्या नेतृत्वात देश विकसित होऊन जगात प्रथम असेल अशी ग्वाही दिली व उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमांस मंडळ अध्यक्ष रमेश गव्हाणे,नितीन जाधव,अनवर पठाण,सुनील घाटगे,मयूर शिंदे,सुरज दुबे, भरत महादे,शरदचंद्र कर्नावट,शैलेश हिरणवार,उमाकांत अनभुले,मुन्नास सय्यद व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन येरवडा प्रभाग अध्यक्षा काजोल विकास सोनवणे व अक्षय मंडलिक यांनी केले. सूत्रसंचालन विकास सोनवणे तर आभार बबन शिंगारे यांनी केले.
फोटो खालील ओळ – डावीकडून अतुल साळवे, काजोल सोनवणे, रमेश गव्हाणे, अनवर पठाण, नितीन जाधव, विकास सोनवणे