येरवडा गावठाणात भागवतगीता वितरणाचा पवित्र उपक्रम

पुणे: येरवडा गावठाण येथे दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी अखिल हिंदू राष्ट्रशक्ती सेना व हनुमान मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धार्मिक वातावरणात भागवतगीता वितरण कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत १०,००० भागवतगीता वाटप संकल्पातील आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आला. कार्यक्रमाचे शुभहस्ते दुष्यंत मोहळ यांनी केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ संघटनेचे अध्यक्ष सुमित भाई चौधरी व उपाध्यक्ष चंद्रकांत भाऊ जगधने यांच्या हस्ते आरती व गीता वाटप करून करण्यात आला. यावेळी भक्तिमय वातावरणात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
या उपक्रमातून युवकांना धार्मिक मूल्यांची जपणूक व समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, पुढील टप्प्यांत आणखी हजारो भागवतगीता वाटप करून हा संकल्प लवकरच पूर्ण केला जाणार आहे.