येरवडा : गणेश विसर्जन मिरवणुकीत अल-हिफाजत कबाब्स अँड केटरर्सचा उपक्रम; ५००० मिनरल वॉटर बॉटल्सचे वाटप

0
IMG_20250907_143642.jpg

येरवडा : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अल-हिफाजत कबाब्स अँड केटरर्स यांच्या तर्फे सर्व गणेश मंडळांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. श्रद्धाळूंना दिलासा देणारा हा उपक्रम शास्त्रीनगर, येरवडा येथे राबविण्यात आला.

पहा व्हिडिओ

गणेश भक्तांच्या सोयीसाठी एकूण ५००० मिनरल वॉटर बॉटल्सचे वाटप करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या थकव्याचा विचार करून थंडगार पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली.

स्थानिक नागरिक आणि मंडळ पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आभार मानले. धार्मिक उत्सवांसोबतच सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गणेशोत्सवाचा उत्साह अधिक रंगतदार झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Spread the love

Leave a Reply

You may have missed