येरवड्यात गणेशोत्सवी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

येरवडा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत महा रक्त केंद्र आणि आदर्श तरुण मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदरतेरेसानगर, सरगम हॉटेल शेजारी, येरवडा येथे पार पडले.
पहा व्हिडिओ
शिबिराला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारत रक्तदान केले. यावेळी मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला.
आदर्श तरुण मित्र मंडळ ट्रस्टचे डॅनियल लांडगे यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा उत्सव नसून समाजसेवेचा संदेश देणारा सोहळा आहे. रक्तदानातून जीव वाचवण्याचे महत्त्व प्रत्येकाने समजून घ्यावे.”
संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे येरवडा परिसरात सामाजिक जाणीव जागृतीचा संदेश पोहोचला.
—