पुणे: “गांजाच्या व्यवहारात पोलिसांचाच हात – लाजिरवाणं वास्तव” “गुन्हेगार पकडणारा… स्वतःच गुन्हेगार निघाला!” आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश

0
n6778147481755841797939240d9ab4ae4187c7c543c255811e5652d7ee297ec43b64dbab991fcef710e6df.jpg

पुणे: गुन्हेगारी रोखण्यासाठी, समाज सुरक्षित ठेवण्यासाठी ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी असते, त्याच वर्दीधारी व्यक्तीने गुन्हेगारी जगतात पाय रोवले, ही बाब अतिशय संतापजनक आणि धक्कादायक आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदे हा गांजा तस्करीच्या प्रकरणात थेट सहभागी असल्याचे उघड झाल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

सहकार नगर पोलिसांनी नुकत्याच केलेल्या ५ किलो गांजा जप्तीच्या कारवाईतून या प्रकरणाचा उलगडा झाला. तपासात कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार आणि स्थानिक माहितीदारांकडून मिळालेल्या धाग्यांमधून वर्दीतील हा गुन्हेगार बाहेर आला. संरक्षण देण्याची जबाबदारी सांभाळणारा पोलीस कर्मचारीच अवैध धंद्यात भागीदार निघावा, हीच खरी खंत.

पोलीस आयुक्तांनी तातडीने NDPS कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश दिले, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. “वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही,” असा त्यांनी दिलेला कडक संदेश समाजाला दिलासा देणारा आहे. मात्र, अशा घटना घडतातच कशा? पोलीस दलात शिरलेल्या काही ‘काळ्या मेंढ्या’ना आळा घालण्यासाठी आतूनच काटेकोर यंत्रणा उभारली नाही, तर समाजाचा विश्वास ढळेल, यात शंका नाही.

गुन्हेगारांना पकडणारा गुन्हेगार ठरणे ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेली कारवाई हे फक्त पहिले पाऊल ठरले पाहिजे. पुढे आणखी कोणी या जाळ्यात सामील आहे का, हेही उघड झाले पाहिजे. पोलिसांची वर्दी ही सन्मानाची, विश्वासाची आणि सुरक्षिततेची खूण आहे; ती गुन्हेगारीला झाकण देण्यासाठी वापरली जाणे ही समाजासाठी अत्यंत घातक बाब आहे.

Spread the love

Leave a Reply