येरवडा: श्रावणी सोमवार उत्सवात अभिषेक व विद्यार्थी गौरव सोहळा

पुणे : येरवडा परिसरातील श्री. सद्गुरू सिद्धलिंग मलाप्पा महाराज मठात श्रावणी सोमवारनिमित्त भक्तिमय वातावरणात शिवलिंगाचा अभिषेक मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. या निमित्ताने मठात येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यंदा विशेष उपक्रम म्हणून मनोज शेट्टी सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने १०वी व १२वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
“आपल्या मुलांच्या यशामागे आई-वडिलांचे अथक प्रयत्न असतात. त्यांच्या श्रमांना व विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा छोटासा सन्मान सोहळा आयोजित केला आहे,” असे सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा मनोज शेट्टी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मठाचे अध्यक्ष मा. शंकर अगलदिवटे व मंगेश म्हेत्रे होते. त्यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास साखरे, परशुराम साखरे, भीमा कानडे व बाबू सुगुर यांनी विशेष परिश्रम घेतले.