पुणे: कल्याणीनगरातील बॉलर पबवर पोलिसांचा छापा : स्वातंत्र्य दिनी ‘ड्राय डे’चे उल्लंघन

0
police-action-on-pub.jpg

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात मद्यविक्रीवर संपूर्ण बंदी असताना, उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर येथील बॉलर पबमध्ये सर्रास दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार येरवडा पोलिसांनी शनिवारी (१५ ऑगस्ट) मध्यरात्री पबवर धाड टाकून कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास एकच्या सुमारास पोलिस पथकाने पबवर छापा टाकला असता, मद्य विक्री सुरू असल्याचे आढळून आले. पबमध्ये त्या वेळी ३०० ते ४०० ग्राहक उपस्थित होते. ग्राहकांना खाद्यपदार्थांसह दारू पुरवली जात असल्याचेही स्पष्ट झाले.

या कारवाईत पबचे मॅनेजर रेमंड फ्रान्सिस डिसोजा (वय ४५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई ज्ञानेश्वर बाळसराफ (वय ४२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जितेंद्र पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम २९३, २२३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बॉलर पबविरोधात यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारच्या कारवाया झाल्या असून, प्रत्येक वेळी केवळ मॅनेजर वा कर्मचाऱ्यांवरच गुन्हे दाखल होतात. पबच्या मालकावर मात्र ठोस कारवाई होत नसल्याने राजकीय दबाव असल्याची चर्चा रंग घेत आहे.


Spread the love

Leave a Reply