पुणे: आयुक्तांच्या बंगल्यातील गायब साहित्य प्रकरणाची चौकशी अद्याप ठप्प

0
IMG_20250810_144258.jpg

पुणे – पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून लाखो रुपयांचे साहित्य गायब झाल्याच्या प्रकरणाची चौकशी अजूनही गती घेताना दिसत नाही. नवे आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबत शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असली तरी, तपास पूर्ण होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

सेवानिवृत्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बंगला सोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. थेट आयुक्तांच्या निवासस्थानाशी संबंधित सुरक्षेचा मुद्दा समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. मात्र, गायब साहित्याच्या तपासापेक्षा ही माहिती बाहेर कशी गेली यावर प्रशासन अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही अधिकारी गायब झालेले झुंबर परत आल्याचे सांगत आहेत, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली. तसेच, आयुक्त कार्यालयातील वादावादीनंतर दोन कायमस्वरूपी व तीन कंत्राटी कामगारांची इतरत्र बदली करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी किती दिवसात पूर्ण होणार आणि त्यातून नेमके काय निष्पन्न होणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply