बाबो.. पुण्यात तयार होणार तब्बल 87 लाखांचे वातानुकूलित स्वच्छतागृह – वाचा सविस्तर

n676144254175481599859673f0114d068032d8ca6d23fa3a72e7d75a0784097aaa7bc29fc00413a051942e.jpg

पुणे – नागपूरच्या धर्तीवर पुण्यातही महापालिका अत्याधुनिक, पूर्ण वातानुकूलित ‘व्हीआयपी’ स्मार्ट स्वच्छतागृहे उभारणार आहे. शहराच्या प्रवेशद्वारांवर अशा पाच स्वच्छतागृहांची योजना असून, पहिल्या स्वच्छतागृहाचे काम बालेवाडीत सुरू झाले आहे.

सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी, स्वारगेट बसस्थानक, बालेवाडी, कात्रज चौक आणि नगर रस्त्यावरील वाघोली येथे ही स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. प्रत्येकाचा खर्च ७० ते ७५ लाख रुपये असून, एकूण प्रकल्पासाठी ४ कोटी ३१ लाखांची तरतूद आहे. स्वारगेट व बालेवाडी प्रकल्पांना स्थायी समितीने मंजुरी दिली असून, बालेवाडीतील काम सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. शेवाळवाडी व वाघोली प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा आहे, तर कात्रज चौकाचा प्रस्ताव लवकरच सादर होणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख संदीप कदम यांनी दिली.

सुविधांची वैशिष्ट्ये

पूर्ण वातानुकूलित स्वच्छतागृह

अंघोळीची व चेंजिंग रूमची सोय

मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स व वायफाय

महिला, पुरुष व तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र सुविधा

अपंगांसाठी सुलभ प्रवेशव्यवस्था

कायमस्वरूपी केअरटेकर व स्वच्छता कर्मचारी


सामाजिक संस्थांची टीका
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या योजनेवर टीका करताना, “पाच स्वच्छतागृहांवर साडेचार कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा कमी खर्चात किमान २० स्वच्छतागृहे उपलब्ध करणे नागरिकांसाठी जास्त उपयोगाचे ठरेल,” असे मत व्यक्त केले.
“नागरिकांना सुटसुटीत व स्वच्छ स्वच्छतागृहे हवी आहेत. मात्र महापालिका अनावश्यक खर्च करून महागड्या सुविधा उभारत आहे, ज्याचा फायदा कंत्राटदारांना होतो,” अशी टीका आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी केली.

Spread the love

You may have missed