येरवड्यातील रुग्णांसाठी दिलासादायक बातमी; स्व. राजीव गांधी रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

पुणे, येरवडा – येरवड्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्वर्गीय राजीव गांधी रुग्णालयात लवकरच अत्यावश्यक ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणार असून, यामुळे रुग्णसेवा अधिक सक्षम होणार आहे.
३० जुलै २०२५ रोजी मुंबईहून आलेल्या पेट्रोलियम आणि विस्फोटके सुरक्षा संघटनेचे (PESO) अधिकारी श्री. शेटे यांच्या उपस्थितीत अंतिम पाहणी पार पडली. या पाहणीत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागडे, ठेकेदार सोहेल इनामदार आणि सामाजिक कार्यकर्ते एजाज रहमान खान हे उपस्थित होते. पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला.




उल्लेखनीय म्हणजे, येरवड्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी एजाज रहमान खान आणि त्यांच्या सोबत असलेल्या विविध पक्षीय कार्यकर्त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन छेडले होते. त्याचं फलित म्हणून आज या ऑक्सिजन प्लांटसाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
या आंदोलनात माजी नगरसेविका सौ. श्वेता चव्हाण, सौ. नीता आडसुळ, सौ. नीता गागडे, सौ. श्रद्धा शेट्टी, सौ. सलमा शेख, सौ. पुजा काटकर, मनोज शेट्टी, महेबुब भाई बडेसाब शेख, किर्ती माछरेकर, गणेश धायमुक्ते, सुहास कांबळे, लक्ष्मण काते, ताजुद्दीन सय्यद, रुपेश घोलप, धनंजय बाराते, रुपेश गायकवाड, बाबु चौधरी, वसीम शेख, शैलेश राजगुरू, मुस्तफा चाबरु आणि मामा बनसोडे यांचा मोलाचा सहभाग राहिला.
हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे श्रेय येरवड्याचे सामाजिक कार्यकर्ते एजाज रहमान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले जात आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे येरवड्यातील आरोग्य व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.