पुणे शहर पोलीस दलात 12 निरीक्षकांची मोठी खांदेपालट; गुन्हे आणि वाहतूक विभागात बदल

0
p0YzxRtIfbfo6cG73nkTfC4S4c0wx74MrxRG3so3.jpg

पुणे | प्रतिनिधी
शहर पोलीस दलातील 12 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागात मोठे फेरबदल झाले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि. 21 जुलै) रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश जारी केले.

या आदेशानुसार चार पोलिस ठाण्यांतील गुन्हे शाखेचे निरीक्षक आता वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी पदोन्नत करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे.

विशेष म्हणजे, गुन्हे शाखेतील निरीक्षक संतोष पांढरे यांची विश्रामबाग पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. उत्तमनगर येथील गुन्हे निरीक्षक विठ्ठल पवार यांची बदली सहकारनगर ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. सायबर पोलिस ठाण्यातील यशवंत निकम यांना स्वारगेट, तर सिंहगड रोडवरील उत्तम भजनावळे यांना चतु:शृंगी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी पाठविण्यात आले आहे. कोथरूडचे विक्रमसिंग कदम आता खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असतील.

तसेच, वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे, विजयमाला पवार, राहुल गौड आणि युवराज नांद्रे यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.

दरम्यान, चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम यांची बदली सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून झाली आहे. भारती विद्यापीठ येथून जितेंद्र कदम यांची विश्रामबाग, खडकी येथून दत्ताराम बागवे यांची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

मुंबई लोहमार्ग पोलीस दलातून पुण्यात आलेले अलंकार सरग यांची बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

या बदल्यांमुळे पुणे शहरातील पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीत लवकरच नव्या स्वरूपातील परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed