माळुंगे येथील लाल काला प्रकरण : कार्यकारी संपादकाला धमकी; सराईत गुन्हेगार खुलेआम सक्रिय

IMG_20250518_173824.jpg

माळुंगे (प्रतिनिधी) – माळुंगे एमआयडीसी परिसरात लाल काला (जुगार) व्यवसाय खुलेआम सुरू असून, याविरोधात आवाज उठवणाऱ्या  या संस्थेचे कार्यकारी संपादक यांना सराईत गुन्हेगार अशोक सोनवणे (रा. दौंड) याने मारहाणीची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.

ही घटना माळुंगे एमआयडीसी चौकीजवळ आज दिनांक 18 मे रोजी 4: 45 घडली असून, गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून दोन दिवस बाजार भरत असताना या भागात लाल काला व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या धंद्यामध्ये आठवडाभर कष्ट करून पैसे कमावणाऱ्या मजुरांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पहा व्हिडिओ

प्रश्न उपस्थित होतो की, या अवैध व्यवसायाला कोणाचे आश्रय आहे? स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कार्यकारी संपादक यांनी या संदर्भात आवाज उठवला असताना त्यांना धमक्या देण्यात येणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, गुन्हेगारांना पोसणाऱ्या यंत्रणांचा भंडाफोड करण्याची गरज अधोरेखित होते.

Spread the love

You may have missed