पुणे: येरवड्यात सराईत गुन्हेगारांकडून २ पिस्तूल, २ जिवंत राऊंड जप्त
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरात पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. आज, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे येरवडा परिसरातील मदर तेरेसा नगर गाडीतळ येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनिकेत उर्फ दत्ता राजू साठे (२२, रा. मदर तेरेसा नगर, येरवडा) आणि आदित्य सतीश कांबळे (२१, रा. सदर) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १,०२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पथकाचे योगदान:
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, दिगंबर चव्हाण, पोलीस हवालदार प्रवीण राजपूत, हरीश मोरे, एकनाथ जोशी, प्रवीण भालचिम, विशाल गाडे, विनोद महाजन, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, नागेश सिंग कुंवर, विशाल इथापे, देविदास वांढरे, राहुल परदेशी, भरत गुंडवाड, मनोज सांगळे, मपोशी पांढरकर आणि मपोशी नलावडे यांचा सहभाग होता.
सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिक तपास गुन्हे शाखा युनिट ४ करीत आहे.