पुणे महानगर पालिका, समाज विकास विभाग दिवाळी बचत बाजार, विक्री व प्रदर्शन

0

दिवाळी बचत बाजारात महिलांच्या उद्योजकतेला संधी – वडगावशेरीत बचत गटांचा यशस्वी सहभाग

पुणे, २८ ऑक्टोबर २०२४ – वडगावशेरी येथील पुण्यनगरी, स्टेला मेरी शाळे शेजारी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बचत बाजारात महिलांना रोजगार व अर्थाजनाची संधी देण्यात आली. या चार दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन मा. उप आयुक्त नितीन उदास व मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण यांच्या हस्ते दि. २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. आणि एकूण स्टॉल 141पैकी  दिव्यांग गट 01 खाद्य पदार्थांचे. 27  ईतर वस्तूचे 113 आणि चार दिवसांची एकूण विक्री 538269 एवढी झाली.

या कार्यक्रमात समाज विकास विभागातील विविध अधिकारी, झोन क्र. १ मधील परिमंडळ प्रमुख समाज सेवक पांडुरंग महाडिक, अण्णा गाडेकर, समूहसंघटीका, तसेच मुख्य सेवा केंद्र समन्वयक तायप्पा डूकळे व सेवा केंद्र समन्वयक शिल्पा हंचाटे यांची उपस्थिती होती. उप आयुक्त नितीन उदास यांनी बाजारात येऊन महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे कौतुक केले व ANU-EMART या वेबसाईटवर बचत गटांची नोंदणी करण्याचे मार्गदर्शन दिले.

बचत बाजारात महिलांनी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यामध्ये खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ, आकाशकंदील, कापडी पिशव्या, कासे भांडी, ज्वेलरी, कपडे, नेल आर्ट, मेहंदी, लोकरी वस्त्र, आरोग्य विमा आदी गोष्टींचा समावेश होता. यंदाच्या बाजारात १४१ महिलांनी सहभागी होऊन २७ बचत गटांनी सणावाराच्या साहित्यांची विक्री केली. या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या सुयश दिव्यांग फाउंडेशनने दिव्यांग पुरुष बचत गटाच्या माध्यमातून आकाशकंदील, दिवे, उटणे व धूप यांसारखी विविध दिवाळीची उत्पादने मांडली होती.

बचत बाजाराच्या माध्यमातून महिलांना व्यवसायिक उभारणी व अर्थाजनाची संधी मिळाली. अनेक व्यावसायिकांना येथे ग्राहकांकडून ऑर्डर मिळाल्या, तर काही महिलांनी नव्या व्यवसायाच्या पहिल्या पावलावर उडी घेतली. महिलांनी या यशस्वी उपक्रमाच्या सातत्याची अपेक्षा व्यक्त केली.

शेवटी कार्यक्रमाचे आयोजन पांडूरंग महाडिक
सोबत समुहसंघटिका सेवाकेंद्र समन्वयक   त्यांची पूर्ण टिम यांच्या यशस्वी प्रयत्नाने हे दिवाळी बचत बाजार यशस्वी रित्या पार पडला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed