मैंदर्गीतील दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांत संताप – व्हिडिओ
मैंदर्गी, ता. 18 – मैंदर्गी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना गेल्या 15-16 दिवसांपासून दूषित पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषत: यादगार मोहल्ला झोपडपट्टी एरिया, वार्ड क्रमांक 1 मधील नागरिकांना नळाद्वारे गढूळ आणि दूषित पाणी मिळत असून, त्यामुळे अनेक लहान मुले आणि वृद्ध आजारी पडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला पाणी गटारीसारखे काळपट आणि गढूळ असून, पिण्यास योग्य नाही. स्थानिक नागरिकांनी नगर परिषदकडे सातत्याने तक्रारी आणि लेखी निवेदने दिली आहेत, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही. आतापर्यंत नागरिकांनी 7 ते 8 वेळा लेखी निवेदने दिली असली तरी, नगर परिषदेतील कर्मचारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत, असे नागरिकांनी सांगितले.
पाहा व्हिडिओ
नागरिकांनी दिलेल्या तक्रारींवर नगर परिषद प्रशासनाकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, जर लवकरच उपाययोजना न केल्यास नागरिकांनी नगर परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
तक्रारींसाठी नागरिकांच्या मागण्या
1. नळाद्वारे स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा तात्काळ करण्यात यावा.
2. दूषित पाण्यामुळे झालेल्या आजारांची जबाबदारी नगर परिषदेकडे घेण्यात यावी.
3. पाणीपुरवठा व्यवस्थापनात सुधारणा करून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी.
नगर परिषदेने यावर त्वरित कारवाई केली नाही तर, नागरिकांच्या तक्रारींवर गंभीर परिणाम होऊ शकतात.