पुणे शहरः कचरा वेचकांच्या मागण्यांसाठी पुणे महापालिकेवर आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास आर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा – व्हिडिओ

0

व्हिडिओ पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करून पुन्हा 30 सेकंद नंतर एकदा क्लिक करा.

पुणे: कचरा वाहक आणि वेचक यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे महानगरपालिकेकडे वारंवार मागण्या करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या वेळी कचरा वाहक आणि वेचक संघटनेने पुणे महानगरपालिकेला आठ दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर मागण्या पूर्ण न झाल्यास खासदार आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या वाहनांना अडवण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विजयबापू डाकले यांनी दिला.

महानगरपालिकेने आठ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. कचरा वाहक आणि वेचक यांनी जमा केलेला कचरा पालिकेच्या संकलन केंद्रांवर नेण्यासाठी तसेच इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही संघटना काम करते.

संघटनेचे सदस्य पुणे शहरातील विविध भागांतून कचरा संकलित करतात आणि जमा झालेल्या कचऱ्यातून भंगार वेगळे करून उपजीविका चालवतात. तथापि, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही महिन्यांपूर्वी एका आदेशाद्वारे कचरा संकलन केंद्रांवर जमा न करता पालिकेने तयार केलेल्या फिडर किंवा ठेकेदारांच्या वाहनांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे कचरा वाहकांना तिप्पट काम करावे लागत आहे, ज्यामध्ये घराघरांतून कचरा संकलन करणे, स्वतःच्या वाहनात भरणे, आणि नंतर तो पालिकेच्या वाहनात टाकणे यांचा समावेश आहे. या समस्या दूर करण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून संघटनेने विविध कार्यालयांमध्ये निवेदने दिली आहेत.

या आंदोलनात विजय डाकले, नामदेव पुलावळे, अमोल जाधव, हनुमंत गायकवाड, मोहन भिसे, बसवराज कळकेट्टी, विजय बगाडे, धनाजी भिसे आणि पुणे शहरातील महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed