Pune City: Accused who was absconding from Yerawada

0

पुणे :- यातील फिर्यादी यांचा मुलगा नामे अभिषेक राठोड वय २२ वर्षे रा. सदर हा दिनांक ०१/११/२०२३ रोजी २१.०० वा. चे सुमा. राहुल वडेवाले शेजारी करणसिटो सोसायटी जवळ वडगावशेरी पुणे येथे गेला असता यातील आरोपी दादया पाटोळे व त्याचे इतर साथीदार यांनी कटकास्थान करुन जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यास लोखंडी धारदार शस्त्राने मारुन त्याचा खुन केला. त्या बाबत येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं.७३९/२०२३ भा.द.वि. कलम ३०२,१२० (ब),३४,१४३,१४४,१४७,१४८,१४९, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे ओम रामचंद्र गोरे हा गेल्या ०९ महीन्या पासुन फरार होता.दि.१२/०८/२०२४ रोजी दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा, युनिट ०४ चे पथक येरवडा पोलीस ठाणे हद्दीत समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार ९१९६ राहुल परदेशी, यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशन कडील खुनाच्या गुन्हयातील ०९ महिन्या पासुन फरारी असलेला आरोपी नामे ओम रामचंद्र गोरे हा नगर रोड येथील वाडीया बंगला, जवळील फुटपाथवर थांबलेला आहे. सदर बातमीच्या अनुषांगाने लागलीच वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हे शाखा, युनिट ४, पुणे शहर कडील पथक वाडीया बंगला, नगर रोड, जवळ गेले असता तेथे फुटपाथवर बातमीतील वर्णनाचा इसम थांबलेला दिसुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव-पत्ता विचारता त्याने आपले नाव ओम रामचंद्र गोरे वय २० वर्षे रा. मारुली चौक, जयप्रकाशनगर, येरवडा पुणे असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दाखल गुन्हयातील आरोपीस पुढील कारवाई कामी येरवडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. शैलेद्र बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरिष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, विशाल गाडे, एकनाथ जोशी, नागेसिंग कुंवर, विनोद महाजन, जहाँगीर पठाण, वैभव रणपिसे, राहुल परदेशी, विशाल इथापे, देविदास वांढरे, शितल शिंदे यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed