पुण्यातील १० शाळा अनधिकृत घोषित – पालकांनी सावध राहण्याचे आवाहन

IMG_20250501_005407.jpg

पुणे, दि. ३० एप्रिल – चालू शैक्षणिक वर्षापासून पुण्यातील दहा शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले असून, या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शाळांना कोणतीही शासकीय मान्यता नसल्यामुळे त्यातून मिळणारे शैक्षणिक प्रमाणपत्र वैध मानले जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षण हक्क मंच पुणे आणि बहुजन पालक संघ पुणे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यांचे भवितव्य धोक्यात न घालता मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्यावा.

या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पात्रता, पुढील शिक्षणासाठीची पात्रता तसेच शासकीय लाभांवरही परिणाम होऊ शकतो, असेही संघटनांनी सांगितले आहे.

येरवडा हलका कोअर कमिटीचे एजाज रहमान खान आणि शिक्षण हक्क मंचचे चांदभाई बळबट्टी यांनी पुणे परिसरातील पालकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, या अनधिकृत शाळांच्या नादी लागू नये आणि आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.

शिक्षण विभागाकडून लवकरच या शाळांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली जाणार असून, संबंधित परिसरातील नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Spread the love

You may have missed