पुण्यात आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदल; प्रमुख मार्गांवर निर्बंध

0
IMG_20260414_131034.jpg

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात विविध ठिकाणी मिरवणुका आणि अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, सकाळी ६ वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत हे बदल लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

पुणे स्टेशन, कॅम्प, विश्रांतवाडी आणि सिंहगड रोड परिसरात वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का दरम्यानचा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार असून स्टेशन परिसरातील वाहने अलंकार चौक मार्गे सोडण्यात येतील.

कॅम्प परिसरात अरोरा टॉवरकडे जाणाऱ्या मार्गांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विश्रांतवाडी भागात दुपारनंतर जड वाहनांना प्रवेशबंदी असेल, तर सिंहगड रोडवरील वाहतूक संध्याकाळी वळवण्यात येणार आहे.

मध्यवर्ती पेठांमधील बाजीराव रस्ता आणि गणेश रस्त्यावर टप्प्याटप्याने वाहतूक बंद केली जाणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय या भागात येणे टाळावे तसेच पोलिसांनी सूचित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply