पुणे: शहीद अब्दुल हमीद व हकिम अजमल खान शाळांमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा, शहीदांना आदरांजली

IMG-20241126-WA00221.jpg

पुणे: येरवडा येथील शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा आणि स्वा.से. हकिम अजमल खान उर्दू माध्यमिक शाळा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत काढलेली संविधान रॅली होती. या रॅलीच्या माध्यमातून भारताच्या संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूल्यांचा प्रचार करण्यात आला.

कार्यक्रमात २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी हल्ल्यातील शूर वीरांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना केली.

या विशेष प्रसंगी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी संविधानाचे मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
– एजाज रहमान खान, सामाजिक कार्यकर्ते

Spread the love

You may have missed