पुणे शहर तहसील कार्यालयामार्फत आधार नोंद अद्ययावतीकरण शिबीर संपन्न

FB_IMG_1745562190556.jpg

पुणे, 25 एप्रिल : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार पुणे शहर तहसिल कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे आधार नोंद अद्ययावतीकरण शिबीराचे बुधवारी, (22 एप्रिल) रोजी घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आले.

या शिबारात एकूण 56 दिव्यांग नागरिकांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात आली.

यावेळी सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे, महापालिका सहाय्यक आयुक्त,गोविंद दांगट, संजय गांधी योजना तहसिलदार सुधाकर मागाडे, नायब तहसिलदार प्रशांत मिस्त्री यांच्यासह आदी उपस्थित होते.

श्री.शिंदे यांनी शिबीराचे निरिक्षण करुन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 बाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.

—————

Spread the love

You may have missed