पुणे: येरवड्यात मध्यरात्री धडक कारवाई; गावठी दारूचा मोठा साठा जप्त; ब्राऊन शुगर प्रकरणातील आरोपी अटकेत

0

पुणे (येरवडा) : लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू व अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत मोठा आघात केला आहे. या कारवाईत गावठी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, ब्राऊन शुगर प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर पोलीस पेट्रोलिंग करत असताना MH12 DE 9833 क्रमांकाची सँट्रो कार संशयास्पद अवस्थेत आढळून आली. वाहनाची झडती घेतली असता कारमधून ११ मोठे कॅन गावठी दारू आढळून आली. या प्रकरणी संगमेश दयानंद शेतप्पा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, अमली पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवाईत ब्राऊन शुगर प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हा आरोपी सुशिक्षित असून चांगल्या घरातील असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले की, शहरात बेकायदेशीर दारू व अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात लक्ष्मीनगर पोलीस सातत्याने कठोर कारवाई करत आहेत. गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून, अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू असून, संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply