पुणे: “मी CP सरांना फोन लावते!” — तरुण- महिला पोलिस बाचाबाचीचे नवे प्रकरण – व्हिडिओ

पुणे : “मी CP सरांना फोन लावते, हो मी बोलते!” असा सिनेमा पाहिल्यासारखा संवाद प्रत्यक्ष रस्त्यावर घडल्याने पुणेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका तरुण आणि महिला पोलिस अधिकाऱ्यामध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीने केवळ वाहतूकच अडवली नाही, तर प्रशासनाच्या ‘प्रतिष्ठेवर’ही चांगलाच डाग लावला.
तरुणावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे. मात्र एवढ्यावर तरुण थांबला नाही. उलट त्याने पोलिस आयुक्तांकडे थेट धाव घेत कारवाईची मागणी केली. म्हणजे ‘गुन्हा दाखल करा, पण माझंही ऐका’ असा हट्टगिरीचा पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.
पहा व्हिडिओ
लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ही घटना “कायदा व सुव्यवस्था सांभाळणारेच जर रस्त्यावर वाद घालत असतील तर सर्वसामान्यांनी नेमकं कुठे जावं?” असा सवाल उपस्थित करत आहे. तर, “CP सरांना फोन लावते” हा संवाद सोशल मीडियावर गाजू लागला असून लोकांनी त्याला नवीन मिमे मटेरियल मानले आहे.
एकंदरीत, रस्त्यावरची बाचाबाची, गुन्हे नोंदवण्याची घाई आणि थेट आयुक्तांपर्यंत पोहोचवण्याची तक्रार — हे सगळं मिळून ही घटना पोलिसांची शिस्त आणि नागरिकांची जबाबदारी यांवर टोचणी लावणारी ठरली आहे.
—