पिंपरी चिंचवड मनपेत कलामसाहेबांच्या जयंतीला वादाचा ठिणगा; अल्पसंख्यक विकास महासंघाचा संताप – व्हिडिओ

पिंपरी चिंचवड : भारताचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशभर आदरांजली वाहिली जात असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मात्र दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.
पहा व्हिडिओ
अल्पसंख्यक विकास महासंघाचे अध्यक्ष रफिक भाई कुरैशी यांनी मनपा आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कलामसाहेबांच्या विचारांचा अपमान केल्याचा आणि जयंती दिनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी महासंघाने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
कुरैशी यांनी सांगितले की, “डॉ. कलाम हे सर्व धर्म, समाज आणि वर्गांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयंतीदिनी जर मनपासारख्या संस्थेत आदरांजली कार्यक्रमालाही योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर ते अत्यंत लाजिरवाणे आणि अपमानास्पद आहे.”
या घटनेमुळे मनपाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक व सामाजिक संस्थांकडूनही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महापालिकेकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
देशभर आज डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि अभिवादन सोहळे आयोजित करण्यात आले. पण पिंपरी चिंचवडमधील हा प्रकार मात्र प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर बोट ठेवणारा ठरला आहे.