पिंपरी: अनधिकृत बांधकाम प्रकरणात अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाची अवमान नोटीस! – व्हिडिओ

0
IMG_20250803_120525.jpg

पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड देत असलेले अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने अवमानाची नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात त्यांनी न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील आश्वासनाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

अतिरिक्त आयुक्तांनी न्यायालयात लेखी प्रतिज्ञापत्र सादर करताना म्हटले होते की, “शहरात जर एखादे अनधिकृत बांधकाम झाले तर आम्हीच जबाबदार राहू.” मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरूच असल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर थेट कारवाईची भूमिका घेतली आहे.

सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव यांनी यासंदर्भात उघडपणे भूमिका घेत, “जनतेचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुट्टी नाही. मग तो कोणाचाही नातेवाईक असो किंवा कोणत्याही मोठ्या पदावर असो,” असे परखड शब्दांत सरकार प्रशासनाला धारेवर धरले आहे.

महापालिकेतील अनधिकृत बांधकामांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना उच्च न्यायालयाने दाखवलेली ही तत्परता प्रशासनाच्या कामकाजावर मोठा सवाल उपस्थित करत आहे. आगामी काळात या प्रकरणाला कोण वळण लागते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed