पुना क्लब परिसरात चारचाकी अडवून धमकी दिल्याचा आरोप; भाजप प्रवक्ते अली दारुवाला यांच्यावि रोधात
पोलीस ठाण्यात गुन्हा

0
Ali-Daruwala.webp

पुणे : भाजपाचे प्रवक्ते अली दारुवाला हे नव्या वादात अडकले असून, पुना क्लब परिसरात चारचाकी वाहन अडवून धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत मोशी नागरकट्टी मालविया (वय ४७, रा. शंकरशेठ रोड, स्वारगेट) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी पुना क्लब येथील स्विमिंग पूलजवळील पार्किंगमध्ये उभी असलेली स्वतःची चारचाकी गाडी काढण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी अली दारुवाला आणि त्यांच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या वाहनाच्या पाठीमागे दुचाकी आडवी लावून गाडी बाहेर काढण्यास अडथळा निर्माण केला. यावेळी फिर्यादीला धमकावण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच, हर्षद गोल्वा यांच्याशी संबंधित पेट्रोल पंपाच्या व्यवहाराबाबत तात्काळ निर्णय घेण्याचा दबाव टाकत धमकी दिल्याचेही फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदने करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed