आळंदीत देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश; योगीराज लॉजवर पोलिसांचा छापा; मॅनेजर अटकेत

0
Prostitution_820c2e.jpg

आळंदी : पुणे जिल्ह्यात देहविक्रयाच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आळंदी परिसरात सुरू असलेल्या एका अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आळंदी येथील योगीराज लॉजमध्ये पैशांचे आमिष दाखवून देहविक्रय चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धडाकेबाज कारवाई करत छापा टाकला.
या कारवाईत लॉजमध्ये सुरू असलेला देहविक्रयाचा अड्डा उघडकीस आला असून संबंधित लॉज मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. लॉजच्या आडोशाखाली महिलांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलले जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी छाप्यादरम्यान आवश्यक पुरावे जप्त केले असून पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धार्मिक व तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत अशा प्रकारचा अनैतिक व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाने अशा अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed