बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; देशभरात नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू

passport.jpg

नवी दिल्ली : देशभरात सोमवारीपासून (२०२५) नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत परदेशी नागरिक आणि स्थलांतराशी संबंधित सर्व बाबींवर नियंत्रण ठेवले जाणार असून, बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्यांवर कठोर शिक्षा होणार आहे.

हा कायदा संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंजूर झाला होता. त्यानंतर ४ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला मंजुरी दिली होती. अखेर सोमवारीपासून या कायद्याची अंमलबजावणी देशभरात सुरू झाली आहे.

सरकारच्या मते, या कायद्यामुळे स्थलांतर प्रक्रियेत पारदर्शकता येईल तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे देशात प्रवेश घेण्याचे प्रकार रोखता येतील. विशेषतः पासपोर्ट व व्हिसा गैरव्यवहारात सामील असणाऱ्यांवर आता थेट कठोर कारवाई केली जाईल.

👉 ठळक मुद्दे :

नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा देशभरात लागू

बनावट पासपोर्ट व व्हिसा वापरणाऱ्यांना कठोर शिक्षा

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कायदा मंजूर

राष्ट्रपती मुर्मू यांनी ४ एप्रिल २०२५ रोजी कायद्याला दिली होती मंजुरी

Spread the love

You may have missed