पुणे: टीव्ही अभिनेता आशिष कपूरवर बलात्काराचा आरोप; पुण्यातून अटक

पुणे : लोकप्रिय टीव्ही अभिनेता आशिष कपूर याला दिल्ली पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. कपूरवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आला असून या घटनेने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एका हाऊस पार्टीदरम्यान ही घटना घडली. पीडितेच्या तक्रारीनुसार, पार्टीदरम्यान वॉशरुममध्ये तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याची शक्यता तपासली जात आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पुण्यात दाखल होऊन त्याला बेड्या ठोकल्या.
या प्रकरणामुळे सिनेसृष्टीत संताप व आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलिसांनी आशिष कपूरला न्यायालयीन कोठडीत हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.
—