पुणे: श्रीरामनवमीनिमित्त पुण्यात वाहतूक बदल; सायंकाळी ४ नंतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

0
IMG_20260326_125321.jpg

पुणे : श्रीरामनवमी उत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी (२६ मार्च) दुपारी चारनंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. विशेषतः बाजीराव रस्ता आणि लष्कर परिसरात या बदलांचा परिणाम जाणवणार आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागात मिरवणुकीमुळे काही काळ वाहतूक बंद किंवा वळवली जाईल.

शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, टिळक चौक (अलका चित्रपटगृह चौक), छत्रपती संभाजी पूल आणि डेक्कन जिमखाना या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाजीराव रस्ता आणि लष्कर भागातील वाहतूक बदल रात्री दहा वाजेपर्यंत लागू राहणार असून, मिरवणूक मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

वाहनचालकांनी गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेचे नियोजन करूनच प्रवास करावा, तसेच पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed