पुणे : मतदार यादी पडताळणीत हलगर्जीपणा; २१४ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
IMG_20260403_192938.jpg

पुणे : आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सध्या विद्यमान मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी (मॅपिंग) करण्याचे काम सुरू आहे. तसेच मतदारांच्या नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता आदी तपशीलांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया देखील राबवली जात आहे. या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.

मात्र, या मोहिमेत काही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे समोर आले आहे. कामात कोणतीही ठोस प्रगती न करणे तसेच मतदारांना योग्य प्रतिसाद न देणे, या कारणांमुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्रमांक २२८ व २३० येथील एकूण २१४ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांविरोधात उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कारवाई केली आहे.

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत २ एप्रिल २०२६ रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

Leave a Reply