पुणे: घोरपडी गावातील समस्यांकडे दुर्लक्ष: स्थानिकांची चिंता वाढली; मा. वसीम पैलवान, पुणे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष
पुणे: घोरपडी गावातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ना नगरसेवक, ना आमदारांनी या भागाकडे लक्ष दिले आहे. गावातील रेल्वे गेट आणि रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. स्थानिक प्रशासन आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उदासीनतेमुळे सामान्य गावकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. अशा अवस्थेत पुढील पाऊल काय, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.
घोरपडी गावातील या समस्या रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) पुणे शहर अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष मा. वसीम पैलवान यांनी महाराष्ट्र माझाशी संवाद साधताना मांडल्या. ते म्हणाले, “गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे, पण प्रशासन मात्र कानाडोळा करत आहे.”