पुणे: गुंजन चौक ते एअरपोर्ट रस्ता अपघातप्रवण; स्पीडब्रेकर नसल्याने नागरिक त्रस्त वारंवार अपघात, नागरिकांचा संताप – व्हिडिओ

पुणे : शहरातील विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक ठरत असून, आता तो अक्षरशः ‘डेथ ट्रॅप’ झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुंजन चौक ते विमानतळ असा साधारण तीन किलोमीटरचा रस्ता असून, या संपूर्ण रस्त्यावर एकही स्पीडब्रेकर नाही. त्यामुळे वाहनांचा वेग वाढतो आणि वारंवार अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत.
पहा व्हिडिओ
याच रस्त्यावरील जेल रोड पोलिस चौकीसमोरील सीमाभिंत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. रात्रीच्या वेळेस येथे स्ट्रीटलाईट नसल्याने अपघाताचे प्रमाण आणखी वाढले आहे. काही दिवसांपूर्वी एका चारचाकीने या जीर्ण भिंतीला धडक दिली होती. तर 15 ऑगस्टच्या सकाळी बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.
स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “या रस्त्यावर त्वरित स्पीडब्रेकर बसवावेत, जीर्ण भिंत काढून टाकावी व स्ट्रीटलाईटची सोय करावी,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही होत आहे.
—