पुणे: हॉटेल वैशाली, गुडलकनंतर पुण्यात अतिक्रमण विभागाची पुन्हा एकदा मोठी कारवाई

0
IMG_20250509_142246.jpg

पुणे | सिंहगड रस्त्यावरील (Singhgad Road) माणिकवागे परिसरातील गोयलगंगा रस्त्यावर बेकायदेशीरपणे थाटण्यात आलेल्या चौपाटीवर महापालिकेने आज (९ मे) मोठी कारवाई केली. सुमारे ६ हजार चौरस फूट क्षेत्रावरील शेड्स, टेबल-खुर्च्या व अन्य पथारी साहित्य हटवण्यात आले असून ६ ट्रक सामान जप्त करण्यात आले आहे.

या चौपाटीवर चायनीज, भेळ, पाणीपुरी, दाक्षिणात्य पदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर थाटले गेले होते. दुकानदारांनी दुकानासमोरील मोकळी जागा व्यापून टाकली होती. दुपारी व रात्री उशिरापर्यंत येथे प्रचंड गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि स्थानिकांना त्रास होत होता. नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. (PMC Action on Illegal Encroachments at Manikbag)

महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. गोयल गंगा रस्त्यासह पादचारी मार्ग, इमारतींच्या साइड मार्जिन आणि फ्रंट एरियातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात आले.

या कारवाईत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, उप अभियंता राजेश खाडे, अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव, श्रीकृष्ण सोनार, मयूर गेडाम, अविनाश धरपाळे यांच्यासह १४ सहाय्यक निरीक्षक, पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि ५५ बिगारी, सेवक सहभागी होते.

Spread the love

Leave a Reply

You may have missed