पुणे शहर : येरवडात पुन्हा हिट अँड रन; ‘मर्सिडीज’ खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटनेचा सीसीटीव्ही आला समोर – Mercedes Car Hit And Run
Pune Mercedes Car Accident : महाराष्ट्रातील पुण्यात पुन्हा एकदा एका लक्झरी कारने चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने नुकत्याच घडलेल्या पोर्शे रोड अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
आताचा हा अपघात पुण्यातील गोल्फ कोर्स परिसरात आज दुपारी घडला. या ठिकाणी एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला चिरडले, परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला. केदार मोहन चव्हाण (41) असे मृताचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मर्सिडीज चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करत आहेत. या आलिशान कारच्या विंडशील्डवर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ‘लस उत्पादक, आवश्यक सेवा’ स्टिकर होते, परंतु कार कोण चालवत होते हे स्पष्ट झाले नाही.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, मोटारसायकलचा तोल गमावून चव्हाण रस्त्यावर पडले आणि त्यांच्या काही लक्षात येण्यापूर्वीच मागून येणाऱ्या एका मर्सिडीजने त्यांना चिरडले. चव्हाण हे पुण्यातील पद्मावती परिसरातील रहिवासी होते. ते ईव्ही कुरिअर सर्व्हिसेसमध्ये काम करत होते आणि स्वारगेटहून पुणे विमानतळावर पॅकेट देण्यासाठी जात होते.
पहा व्हिडिओ-