पुणे शहरः ससूनमधील एमआरआय मशीन वीस दिवसांपासून बंद युवक काँग्रेसकडून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – व्हिडिओ

0

पुणे:  ससून सर्वोपचार रुग्णालयातील एमआरआय मशीन गेल्या वीस दिवसांपासून बंद असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या अत्यंत महत्वाच्या शासकीय रुग्णालयात मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल व गैरसोय होत आहे. मशीन तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रसंगी निवेदन स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या समोर विद्यार्थी काँग्रेसचे पुणे जिल्हा महासचिव कृष्णा साठे, अनुज रंगारी, आणि ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते.

रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले की, रुग्णालय प्रशासन रुग्णांना खाजगी रुग्णालयात किंवा लॅबमध्ये जाऊन एमआरआय करण्याचा सल्ला देत आहे, जो खर्चिक आहे. त्यामुळे गरीब रुग्णांमध्ये असंतोष पसरला आहे. रुग्णांनी विचारले आहे की, जर आमच्याकडे पैसे असते तर आम्ही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलो असतो का? वीस दिवसांपासून मशीन बंद आहे, त्यामुळे याची जबाबदारी कोण घेणार?

पहा व्हिडिओ

ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि अधीक्षक यलप्पा जाधव हे अनेक दिवसांपासून सुट्टीवर असल्याने रुग्णसेवा आणि व्यवस्थापन रामभरोसे आहे. त्यामुळे काही अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर हे एमआरआय मशीन तात्काळ सुरू झाले नाही, तर आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मंत्रालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *