पुणे: पुलाखाली ‘इंद्रायणी’च्या साक्षीने गांजाचा धंदा; पोलिसांचा दणका!

0
01_12_2024-30_05_2024-ganjapannaarrested.jpeg

पुणे : एकीकडे शहरात अमली पदार्थविरोधी मोहिमा राबवल्या जात असल्याचे दावे, तर दुसरीकडे पुलाखाली सर्रास गांजाची विक्री… अशीच विसंगती पुन्हा एकदा समोर आली आहे. इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ उघड्यावर सुरू असलेला गांजाचा व्यवसाय अखेर देहूरोड पोलीस ठाणे यांच्या कारवाईत उघड झाला.

शनिवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी येलवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून अंकुश अनंत गाडे (५१) याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आरोपीकडे तब्बल ५९७ ग्रॅम गांजा, किंमत सुमारे २९ हजार ८५० रुपये, जप्त करण्यात आला. एवढ्या प्रमाणात अमली पदार्थ घेऊन पुलाजवळ ‘ग्राहकांच्या’ प्रतीक्षेत उभा असलेला हा प्रकार स्थानिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण खेडकर यांनी फिर्याद दाखल केली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की, इतक्या उघडपणे गांजाची विक्री होत असताना यापूर्वी कोणाची नजर चुकली होती?

नदीकाठ, पूल आणि गावाकडे जाणारे रस्ते आता अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी ‘सोयीस्कर’ ठिकाणे बनत आहेत का? स्थानिक नागरिकांमध्येही याबाबत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांची कारवाई कौतुकास्पद असली तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सातत्याने गस्त आणि कडक नजर आवश्यक असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, देहूरोड पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीकडून आणखी माहिती मिळवली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed