पुणे: इंधन टंचाईची अफवा पसरवल्याने पेट्रोल पंपावर कारवाई; पुरवठा स्थगित; वाचा सविस्तर

0
IMG_20260329_160457.jpg

पुणे : इंधन टंचाईबाबत निराधार अफवा पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करत पुलगेट परिसरातील ‘हायवे पेट्रोलियम सेंटर’ या पेट्रोल पंपाचा इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित केला आहे.

हा पेट्रोल पंप अली दारूवाला यांच्या मालकीचा असून ते ऑल इंडिया पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते तसेच भाजप अल्पसंख्याक आघाडीचे नेते आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असताना संबंधित पंपाकडून तुटवड्याबाबत चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली. यामुळे शहरातील इतर पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

ही बाब ‘मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स २०२४’ अंतर्गत गंभीर अनियमितता मानली गेली असून डीलरशिप कराराचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जिल्हा पुरवठा कार्यालयाने संबंधित चालकाला २४ तासांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास पेट्रोल पंपाची डीलरशिप कायमस्वरूपी रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed