पोलीस हवालदार अमजद पठाण यांना ‘पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह – 2024’

पुणे, ता. १ मे: पुणे शहर पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस हवालदार अमजद पठाण यांना यंदाचे ‘पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह – 2024’ प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
हा पुरस्कार राज्य पोलीस दलामार्फत दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला जातो. अमजद पठाण यांनी दीर्घकाळ अतिशय सचोटीने सेवा बजावली असून, गुन्हे शोधकामात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुणे पोलीस दलासाठीही हा गौरवाचे क्षण ठरले आहेत.