PHOTO: “पगाराचा अकडा आणि जमिनीचा तुकडा.” सिंगल मुलांसाठी खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “खरं आहे भाऊ”

n6406628471732513337197a71dab0e2070af7cdee5fa9c9fed93976f6f3d45089b3239eb617ca1056b2396.jpg

लग्नाच्या अपेक्षा आणि वास्तव यावर पुणेरी पाटीचा सडेतोड संदेश!

पुणे – पुणेरी पाट्या म्हणजे तिरकस विनोद आणि थेट मुद्द्याचा अप्रतिम संगम. याच शैलीतील एक पाटी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे. लग्नासाठी मुलांकडून वाढत चाललेल्या अपेक्षांवर भाष्य करणाऱ्या या पाटीने अनेकांना हसवले असून विचार करण्यास भाग पाडले आहे.

एक तरुण, हातात पोस्टर घेऊन चौकात उभा राहिला आहे. त्या पोस्टरवरील मजकूर असाच काहीसा आहे की वाचणाऱ्याला नक्कीच हसू येईल: “पगाराचा आकडा आणि जमिनीचा तुकडा यावर अवलंबून असते बायको मिळेल की नाही!”

मुलींच्या अपेक्षांनी मुलांच्या लग्नाची चिंता वाढली

लग्न जुळवताना आता मुलाकडून भौतिक संपत्ती, उच्च पगार, स्वतंत्र घर, आणि कुटुंबातील कमी सदस्य यांसारख्या अपेक्षा अधिक प्रमाणात व्यक्त होत आहेत. काही पालकही या अपेक्षांमध्ये सामील होत आहेत. परिणामी, अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत अडकून पडले आहेत.

विवाहसंस्थेची बदलती परिस्थिती
सध्याची विवाहसंस्था पैशाभोवती फिरताना दिसत आहे. पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील नोकरी करणाऱ्या तरुणांनाच मुलगी दिली जावी, अशी मानसिकता काही कुटुंबांनी स्वीकारली आहे. ग्रामीण भागांमध्ये तर ‘पैसे देऊन लग्न’ करण्याची प्रथा अजूनही प्रचलित असल्याचे दिसते.

Spread the love

You may have missed