पतीचा पगार वाढला की पत्नीची पोटगीही वाढणार; दिल्ली हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली – कौटुंबिक वादातील पोटगीसंदर्भात दिल्ली हायकोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. घटस्फोटानंतर पत्नीला दिली जाणारी पोटगी पतीच्या उत्पन्नाशी थेट जोडली जाईल, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान म्हटले की, “पतीचे उत्पन्न वाढत असेल किंवा पेन्शनमध्ये वाढ होत असेल, तसेच जीवनावश्यक खर्च वाढले असतील, तर पत्नीला मिळणारी पोटगी वाढवणे आवश्यक आहे.”
हा निकाल एका वृद्ध महिलेच्या याचिकेवर देण्यात आला आहे. संबंधित महिलेने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले होते.
या निर्णयामुळे विभक्त पत्नींच्या हक्कांना बळकटी मिळाली असून, पतीच्या वाढत्या उत्पन्नाचा थेट परिणाम पत्नीच्या पोटगीवर होणार आहे. म्हणजेच, पतीचा पगार वाढला की पत्नीची पोटगीही वाढवली जाईल.
यामुळे भविष्यातील प्रकरणांमध्ये महिलांना योग्य तो न्याय मिळेल, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
—