फुरसुंगी पोलिसांचा धडक छापा; कात्रजमधील लॉजवर वेश्याव्यवसाय उघडकीस – व्हिडिओ

0
IMG_20251231_130151.jpg

पुणे : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा फुरसुंगी पोलिसांनी धडक छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी काही तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यांना देहविक्रयासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पहा व्हिडिओ

फुरसुंगी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक तेहसीन बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर, पवन सोनपा आणि बिंदा नावाच्या महिलेसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या लॉजमध्ये नियमितपणे वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींवर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येत असून, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

फुरसुंगी पोलिस पुढील तपास करत आहेत आणि गुन्ह्यात सामील असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed