पुणे महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ई-ओळखपत्र अनिवार्य; ३१ जुलैपर्यंत मुदत, अन्यथा कारवाई

0
esakal_2024-06_ce659fa7-b565-4702-a299-42eee13ba674_managara.jpg

पुणे, प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 9 ते 10 हजार कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आता ई-ओळखपत्र मिळणार आहे. या माध्यमातून त्यांना राज्य विमा महामंडळाच्या वैद्यकीय सुविधा व इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांचे केवायसी (KYC) पूर्ण करणे ठेकेदारांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

महापालिकेच्या स्वच्छता, अग्निशमन, आरोग्य, जलपुरवठा आणि सुरक्षा आदी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनमान्य सेवा-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, याआधी महापालिकेच्या पाहणीत अनेक कर्मचाऱ्यांकडे ई-ओळखपत्रच नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अनेक कर्मचारी वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहात होते.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी यासंदर्भात आदेश काढून सर्व ठेकेदारांना कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची नोंदणी करून ओळखपत्र तयार करणे आणि त्याचे केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.

प्रत्येक विभागातील पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून ही माहिती संकलित करून नियमित पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ३१ जुलै २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

कारवाईची तयारी:
जर कोणत्याही ठेकेदाराने किंवा कर्मचाऱ्याने या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ई-ओळखपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed