पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीवर लगाम; वीस सराईत गुन्हेगार तडीपार

पिंपरी, ता. ९ : प्रतिनिधी गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोठी कारवाई करत परिमंडळ तीनच्या हद्दीतील तब्बल २० सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. ८ जुलै) करण्यात आली असून, संबंधितांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी, स्थानिक शांतता भंग आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या गुन्हेगारांविरुद्ध ही कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये पुढील प्रमुख गुन्हेगारांचा समावेश आहे:
भरत मुळे (२२, केळगाव, आळंदी), रामदास साळुंखे (३६, आंबेठाण), महेंद्र ससाणे (२८, चाकण), किरण धनवटे (२८, एकतानगर, चाकण) — २ वर्षांसाठी तडीपार
रेखा हिरोत (४८, चक्रपाणी वसाहत, भोसरी) — ६ महिने
हनुमंत नायकोडी (२२, गोरे वस्ती, चाकण), प्रद्युम्न पानसरे, आकाश तापकीर (दोघेही चऱ्होली बुद्रुक), प्रतीक पवार (२१, मोरे वस्ती, चिखली), ऋषभ मांडके (२८, कुदळवाडी, चिखली), घनशाम यादव (२५, पवार वस्ती, चिखली), अफजल मणियार (२७, पूर्णानगर, चिंचवड), अजय दुनघव (२८, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) — २ वर्षांसाठी तडीपार
अक्षय जाधव (३२, रुपीनगर, तळवडे), प्रिया कंजारभट (३०, चऱ्होली फाटा), प्रभू कोळी (२७, इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे), जितेंद्र साहू (२२, बर्गे वस्ती, चिखली), दर्शना राठोड (४०, खराबवाडी, चाकण), मोरंती ऊर्फ मोरवती राजपूत (३६, मरकळ), दीपक खेंगले (१९, पाईट, खेड) — १ वर्षासाठी तडीपार
पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी वावर कमी होईल, तसेच परिसरात शांततेचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वीही गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने तडीपार करण्यात आलेली ही कारवाई लक्षवेधी ठरली आहे.
—