प्रचारादरम्यान राडा; शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या गाडीवर दगडफेक;
उमेदवार सारिका पवार गंभीर जखमी, हडपसरमधील काळेपडळ परिसरात तणाव

InShot_20260108_004022139.jpg

पुणे : पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील काळेपडळ परिसरात प्रचारादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला असून, या हल्ल्यात प्रभाग क्रमांक ४१ मधील उमेदवार सारिका पवार या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना भानगिरे हे उमेदवार सारिका पवार व कार्यकर्त्यांसह काळेपडळ परिसरात प्रचारासाठी फिरत होते. याच दरम्यान अचानक काही अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. एक मोठा दगड थेट गाडीवर आदळल्याने वाहनाचे नुकसान झाले असून, त्या वेळी गाडीत असलेल्या सारिका पवार यांना गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर तातडीने जखमी सारिका पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

प्रचारादरम्यान घडलेल्या या हिंसक घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पुढील काही काळासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Spread the love

You may have missed